धुळे : पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त; धुळे – पुणे रेल्वे सुरू करण्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांचे संकेत

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच धुळे जिल्ह्यातील नरडाणा ते पुणे रेल्वे गाडी सुरु होईल असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले आहेत. धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांच्याशी बोलतांना त्यांनी असे संकेत दिले आहेत.

धुळे जिल्ह्यातून थेट पुणे कडे जाण्यासाठी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे यापूर्वी देखील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केली होती. तर प्रवासी वर्गांकडून देखील ही मागणी नेहमीचीच होत आहे. नरडाणा मार्गे कल्याण व्हाया पुणे रेल्वे सुरु करावी जालना येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी निवेदन देवून चर्चा केली.

यासंदर्भातील अहवाल धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी भोकरदन येथील निवासस्थानी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेवून अहवाल दिला. पुणे येथे जाण्यासाठी खानदेशच्या प्रवाशांना एकही प्रवाशी गाडी नाही. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असुन औद्योगिक क्षेत्रासोबत संगणक क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालये पुण्यातच आहेत. त्यामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यासाठी पश्चिम खानदेशसाठी (तापी सेक्शन) पुणेसाठी लवकरच प्रवाशी गाडी सुरु करावी. अशी मागणी यावेळी धोबी यांनी केली. तसेच सध्या सुरु असलेली मुंबई सेंट्रल ते नंदुरबार ही गाडी संध्याकाळी नरडाणा येथून, नंदुरबार, चलथान, बेस्तान, विरार, कल्याण, पनवेल मार्गे पुणे पावेतो करण्यात यावी. मुंबईतील प्रवाशांना पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वे स्थांनकावर उतरता येईल व पुणे जाणारे प्रवाशांची मोठी सोय निर्माण होईल असे रेल्वेमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांना यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी सांगितले. यावेळी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले की, यासंदर्भात रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक निरज वर्मा यांना नरडाणा व दोंडाईचा येथे पाठवले होते. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच नरडाणा ते पुणे रेल्वे गाडी सुरु होईल असे आश्वासन यावेळी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचाशी बोलतांना संकेत दिले आहेत.

हेही वाचा:

The post धुळे : पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त; धुळे - पुणे रेल्वे सुरू करण्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांचे संकेत appeared first on पुढारी.