धुळे : पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा म्हणून उपोषण

पांझराकान उपोषण

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
पांझरा कान सहकारी साखर कारखान्यातील साहित्याची बेकायदेशीर विक्री थांबवावी, कारखान्यातील रहिवासींना बेकायदा नोटीस बजावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी येथील साई सेवा समितीचे अध्यक्ष अजय सोनवणे यांनी आजपासून अन्नत्याग उपोषणाला सुरवात केली आहे.

येथील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. भाडणे येथील पांझरा कान साखर कारखान्यातून रात्री-अपरात्री साहित्याची वाहतूक करुन भंगारात विक्री केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत तसेच बंदोबस्त तैनात करावा या मागणीसाठी अजय सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच कारखान्याच्या ४० वर्षांपासूनच्या निवासी कर्मचाऱ्यांना बेकायदा नोटीस देवून त्रास देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरवात केली आहे.

या आंदोलनात साई सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पांझराकान साखर कारखाना हा २४ तास पोलिसांच्या व सीसीटीव्हीच्या निगराणीत असावा तसेच कारखान्याचा करारनामा जनतेसमोर सादर करावा अशी मागणीही अजय सोनवणे यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post धुळे : पांझरा-कान सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा म्हणून उपोषण appeared first on पुढारी.