Site icon

धुळे : पांरपारिक नृत्य सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे

धुळे (पिंपळनेर), पुढारी वृत्तसेवा :
सद्गुरु श्री. खंडोजी महाराज यांच्या १९४ व्या पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सव निमित्ताने मंगळवारी खंडोजी महाराज क्रीडा संकुल येथे पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

या स्पर्धेत साक्री तालुक्यातील चावडीपाडा येथील कलाकारांनी सादर केलेल्या पेरणी नृत्याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी धुळे, नंदुरबार, नाशिकसह गुजरात राज्यातून १४ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन हभप योगेश्वर महाराज देशपांडे, खासदार डॉ. हिना गावीत व जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक दर्यावगीर महंत, शेतकी संघाचे चेअरमन विलास बिरारीस, जि.प.सदस्य हर्षवर्धन दहिते, मोहन सूर्यवंशी, सरपंच देविदास सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके, सुनील आलई, प्रताप पाटील, प्रवीण चौरे, तुकाराम बहीरम, सचिन धामणे, संभाजी अहिरराव, अनिल बागुल, दत्तात्रेय पवार, रवींद्र कोतकर, नितीन कोतकर, संजय कोठावदे, योगेश नेरकर, नीलेश कोठावदे, देवेंद्र कोठावदे, योगेश बधान, डॉ. दळवेलकर, गजेंद्र कोतकर, रुपेश बधान, प्रमोद भावसार आदी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांनी नृत्यासह वाद्य वाजवत श्रोत्यांचा आनंद द्विगुणित केला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी विविध पारंपरिक नृत्यकलेचा आनंद घेतला. यात नंदी नृत्य, टीपरी नृत्य, पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून प्रा. रोहिदास गायकवाड, एस.डी.पाटील, शिक्षिका उज्वला कोकणी यांनी केले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ.मिलिंद कोतकर, देवेंद्र गांगुर्डे, योगेश कोठावदे, प्रतिक कोतकर, राजेंद्र पेंढारकर, माधव पवार, आकाश ढोले, सुभाष महाजन, नितीन लोखंडे, दयाराम सोनवणे, कैलास सूर्यवंशी, प्रमोद जोशी, जितेंद्र कोतकर, हिम्मत जगताप, हिरालाल शिरसाठ, ईश्वर ठाकरे, जगदीश गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले. ही नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.

स्पर्धेतील विजेते असे..
स्पर्धेत प्रथम पेरणी नृत्य चावडीपाडा (ता.साक्री), द्वितीय पावरी नृत्य वडपाडा (ता.साक्री), तृतीय क्रमांक नंदी पार्टी संघ माळीवाडा (जि.नाशिक), उत्तेजनार्थ टिपरी नृत्य लव्हाळवाडी(अकोला), महिला नृत्य, अकोला भोंगऱ्या नृत्य साकळपाणी. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, १९ हजार व ७ हजार असे बक्षीस देण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश ढोले, सुभाष महाजन यांनी केले.

हेही वाचा :

The post धुळे : पांरपारिक नृत्य सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे appeared first on पुढारी.

Exit mobile version