Site icon

धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पाणी पुरवठा योजनांच्या कामाअभावी गावागावात पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून मंजूर, कार्यरत व प्रस्तावित पाणी पुरवठा योजनांच्या कामांना आणि प्रस्तावांना गती द्यावी. दरम्यान जे ठेकेदार व अधिकारी कामाची टाळाटाळ, दिरंगाई करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशा सुचना आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत दिल्या.

धुळे तालुक्यातील प्रत्येक गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून आ.कुणाल पाटील प्रमुख उपस्थितीत धुळे तालुक्यातील विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची सयुंक्त बैठक घेण्यात आली. सन 2021-22 मध्ये मंजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा व प्रस्तावित योजनांचा यावेळी आ. कुणाल पाटील यांनी गावनिहाय आढावा घेतला. धुळे तालुक्यात कार्यादेश निर्गमित प्रगतीपथावरील पाणी पुरवठा योजनांची माहिती यावेळी घेण्यात आली तसेच मंजुर प्रक्रियेत असलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रक्रियेत आहे. अशी माहीती यावेळी देण्यात आली.

बैठकित आ. पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांकडून योजनाबाबत माहिती जाणून घेतली. जे ठेकेदार कामास विलंब करतील त्यांच्यावर कारवाईच्याही सूचना आ.कुणाल पाटील यांनी यावेळी दिल्या.

कापडणे-सोनगीर मजिप्राकडे

धुळे तालुक्यातील कापडणे आणि सोनगीर गावाची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत केली जाणार असल्याची माहिती यावेळी आ.कुणाल पाटील यांनी दिली. कापडणे गावासाठी देवभाने धरणापासून पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे. त्यात जलशुध्दीकरण केंद्र, पाईपलाईन पाण्याची टाकी यांचा समावेश आहे. सोनगीर व कापडणे पा.पु.योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी शासन पाणी पुरवठा योजनांच्या आढावा बैठकीला माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासह माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, उपअभियंता संजय पड्यार, शाखा अभियंता जयदिप पाटील, राहूल सैंदाणे, विजय गावीत, बाजार समितीच माजी प्रशासक रितेश पाटील, डॉ.दत्ता परदेशी, काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याच्या आ. पाटील यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Exit mobile version