धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

बनावट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले असून चोरट्याकडून  दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मालेगाव येथून चोरी केलेल्या पिकअप वाहनांची धुळे येथे विल्हेवाट लाावण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक योगेश राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील तसेच रफिक पठाण, प्रभाकर बैसाने, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप आदी पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवले. या पथकाने धुळ्याकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या रोडवरील “हॉटेल फाय फाय” जवळ दोन जणांना संशयीतरित्या उभे असताना दिसून आले. त्यांच्याकडे पिकअप वाहन (एम एच 48 टी 1637) क्रमांकाची तसेच एक विना क्रमांकाची पिकअप वाहन असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन पोलीसांच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र पोलीस आल्याचे पाहून दोघांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी इम्रान शाह गफारशहा (रा. मालेगाव) तरुणाला ताब्यात घेतले. तसेच त्याची चौकशी केली असता मालेगाव येथीलच त्याचा साथीदार अफसर शहा सलीम शहा हा पळून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार इमरान शहा गफार शहा यांनी मालेगाव येथील हुडको कॉलनी मधून पीकअप वाहने चोरली होती. तसेच विना क्रमांकची पिकअप वाहन त्याने दोन महिन्यापूर्वीच यासीन मशिदी जवळून चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केले आहेत. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी आरोपींच्या चौकशीमधून आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचा:

The post धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात appeared first on पुढारी.