धुळे : बोरकुंडला नववर्षाच्या स्वागतासाठी इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

धुळे; पुढारी वृत्तसेवा : बोरकुंड येथील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे रविवारी जिल्हास्तरीय मॅरेथाॅन व रक्तदान शिबीराने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. रक्तदान शिबिरात तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्थेत तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिलाला. या मॅरेथाॅनमध्ये एकुण ५९३ युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. दरम्यान मंगळवारी (दि.२ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाचे व शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी केले आहे.

इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी क्रीडा व सामाजिक महोत्सवाने नववर्षाचे स्वागत करण्यात येते. यात बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात झालेल्या या मॅरेथाॅन स्पर्धेचा शुभारंभ, आंतरराष्ट्रीय धावपटू कांतीलाल कुंभार (उंबरदहाड पेठ, नाशिक) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, डॉ.विजय हिरे, डॉ.योगेश ठाकरे इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव तथा जि.प.सदस्य शालिनीताई भदाणे, धुळे पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी, बोरकुंडचे सरपंच सुनीता हेमंत भदाणे, रतनपुरा सरपंच दगडू दौलत माळी डॉ.राजेंद्र भदाणे, माजी उपसभापती विद्याधर पाटील, पं.स.सदस्य राजेंद्र शर्मा, प्राचार्य ईश्वर बडगुजर, आण्णा कुरणे, वाल्मीक ठाकरे, दौलतसिंग जाधव, हरि पगारे, श्रीराम पाटील, डाॅ.संदीप पाटील, सिताराम सोनवणे हे उपस्थित होते.

ही मॅरेथाॅन स्पर्धा १५ ते ३५ वर्ष वयोगटातील युवक व युवतींसाठी खुली होती. या स्पर्धेत युवतीमध्ये, शेवंता पावरा(हाडाखेड), शकिला पावरा(शिरपुर), आरती पावरा(नंदुरबार), यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला तर दिपीका पवार(पिंपळनेर), रिया पावरा(शिरपूर) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. तसेच युवकांमध्ये सोमनाथ पावरा(सांगवी), कमलेश लोते(मोरदड), विशाल चव्हाण(मोरदड) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तर जगन्नाथ पवार (साक्री) व सागर माळी(बोरीस) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. विजेत्यांना १० हजार रुपयाचे दोन प्रथम पारितोषिक, ७ हजाराचे दोन द्वितीय पारितोषिक, ५ हजाराचे दोन तृतीय पारितोषिक व हजार रुपयाची चार विशेष उत्तेजनार्थ पारितोषीके देण्यात आली. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व शाहिरी कार्यक्रम

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला (दि.२ जानेवारी) प्रबोधन व शाहिरी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. बोरकुंड येथील देवडी परिसरात सायंकाळी ७ वाजता होणार्‍या या कार्यक्रमात बालरोग तज्ञ डाॅ. अभिनय दरवडे यांचे, आजच्या काळात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे महत्व या विषयावर व्याख्यान होईल. तसेच प्रसिध्द शाहीर स्वप्निल डूंबरे (सिन्नर) व सहकारी शाहिरी कार्यक्रम सादर करतील. यात परिसरासह जिल्ह्यातील युवक युवतींनी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे यांनी केले आहे.

यावेळी अनिल देसले, ए.बी.खांडेकर, सतीष भदाणे, अमोल पाटील, महेश पाटील, डाॅ.आनंद पवार, एन.के.मराठे, राजेंद्र बारे, भुपेंद्र मालपुरे, आर.बी.शिंदे यांनी परिक्षक म्हणुन काम पाहीले. मॅरेथाॅनसाठी एम.आर.वारुळे, के.एम.पाटील, अक्षय हिरे, शुभम धामोडे, सिद्धार्थ मैलागिर. बी.एच.मगर, एस. बी.बेहेरे, आदी प्रयत्नशील होते.

हेही वाचा

The post धुळे : बोरकुंडला नववर्षाच्या स्वागतासाठी इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव appeared first on पुढारी.