धुळे : भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शिवेसनेचे नवरात्रोत्सवानिमित्त सफाई अभियान

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

येथील वैद्यकीय महाविद्यालयातील पुरुष उपचार विभागात सफाई अभियान राबवून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटस्थापनेचा अनोखा संदेश दिला आहे. जनतेची सेवा करणे हाच शिवसेनेचा हेतू असून केवळ प्रशासनावर आरोप न करता प्रत्यक्ष स्वच्छता करून रुग्णसेवा करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली.

भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छता तसेच रुग्णालय प्रशासनाला भेडसावणाऱ्या समस्यांसह या रुणालयाचे सर्व नियोजन बिघडले होते. शिवसेना धुळे महानगरवतीने गेल्या महिनाभरापासून या सर्वोपचार रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला रुग्णालयाच्या बाहेरील आवाराची 20 दिवसापूर्वी स्वच्छता करून गांधीगिरी करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर  रुग्णालयाच्या विविध विभागांच्या प्रश्नासंदर्भात या रुग्णालयाचे डीन डॉ. अरुण मोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मुकर्रम खान, डॉ. शेजवळ यांच्याशी विविध प्रश्नांबाबत चर्चा करुन ते सोडविण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेल मेडिसीन वार्डातील स्वच्छतागृहे व संपूर्ण वार्डाची स्वच्छता करुन परत या रुग्णालयाप्रती अनोखा संदेश दिला आहे.

शिवसेनेने केलेल्या आंदोलनानंतर या रुग्णालयात अनेक बदल घडून आले असून दररोज स्वच्छता देखील केली जात असल्याने शिवसेनेने डीन डॉ. अरुण मोरे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मुकर्रम खान यांचे अभिनंदन केले. या स्वच्छता मोहिमे प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे , जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, शहर संघटक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, ज्ञानेश्वर फुलपगारे, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, संजय जवराज, प्रविण साळवे, शरद गोसावी, मनोज गवळी, मनोहर पाटील, पंकज भारस्कर, हेमंत बागुल, महादू गवळी, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post धुळे : भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शिवेसनेचे नवरात्रोत्सवानिमित्त सफाई अभियान appeared first on पुढारी.