धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने

मंत्री गुलाबराव पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात मेळाव्यासाठी येत असताना राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा पन्नास खोके, एकदम ओके च्या घोषणा दिल्या. दरम्यान आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धुळ्याच्या सैनिक भवनामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे जळगावच्या दिशेने धुळ्याकडे येणार असल्याचे माहिती होती. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर सुरत महामार्गावरील कृषी महाविद्यालयासमोर आंदोलनाचे नियोजन केले. मात्र नियोजित वेळेपेक्षा राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना उशीर झाला. त्यांचा ताफा कृषी महाविद्यालयासमोर आला. यावेळी जळगावच्या दिशेने अन्य गाड्यांची वर्दळ देखील होती. ताफाजवळ येताच आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी मंत्री पाटील यांची गाडी जवळ येतात निदर्शने करीत घोषणाबाजी वाढली.

याचदरम्यान आंदोलन करणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, जिल्हा समन्वयक कैलास पाटील, नाना वाघ, भरत मोरे, विनोद जगताप, पुरुषोत्तम जाधव संजय जवराज, संदिप सुर्यवंशी, प्रविण साळवे, शरद गोसावी, मच्छिंद्र निकम, आबा भडागे, भैय्यासाहेब बागुल, छोटुभाऊ माळी, देवराम माळी, भटुआप्पा गवळी, प्रकाश शिंदे , कुणाल कानकाटे, सुनिल चौधरी कैलास मराठे,आबा हरळ, अजय चौधरी, दिपक गोरे ,गुलाब धोबी, नाना पाटील, अमोल ठाकूर, रोहित धाकड, शुभम रणधीर, वैभव पाटील, तेजस सपकाळ आदीना पोलिस पथकाने ताब्यात घेतले.

The post धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने appeared first on पुढारी.