Site icon

धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळ्यातील मोगलाई परिसरात विटंबना झालेल्या धार्मिक स्थळाला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट दिली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे रोहित चांदोडे यांनी परिस्थितीची माहिती दिली. या ठिकाणी यापूर्वी दोन वेळेस विटंबनेचा प्रयत्न झालेला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विटंबना करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले जाईल. मात्र त्यामागे असणारा सूत्रधार देखील बाहेर आला पाहिजे. त्याच्यावर कठोर कारवाई झाल्याशिवाय धार्मिक तेढ करण्याचे हे प्रकार थांबणार नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कोणतीही तमा न बाळगता तातडीने सूत्रधार याला गजाआड करण्याची मागणी यावेळी केली.

त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवरून ही माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा नेते नितेश राणे यांना देखील दिली त्यानुसार धार्मिक स्थळातील मूर्ती विटंबनाच्या घटनेची राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी दखल घेतली असून त्यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याशी थेट संवाद साधून माहिती घेतली. यावेळी समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करावी, असे देखील सुचवले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी आरोपीला खुले सोडले जाणार नसल्याचे आश्वासन दिले.

सीसीटीव्ही बंद

दरम्यान प्राथमिक तपासामध्ये या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले. मात्र सीसीटीव्ही कॅमेरेच बंद असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गेल्याच वर्षी पोलीस प्रशासनाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करून कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र आता विटंबना झाल्यानंतर हे कॅमेरे बंद असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

The post धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल appeared first on पुढारी.

Exit mobile version