धुळे येथे थेट बिंदू नामावलीच बदलून भरतीप्रक्रीयेबाबत तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

न्यायालय www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक संस्थेमधील शिक्षक भरतीची बिंदू नामावली बदलून नियुक्ती केल्याचा प्रकार एका तक्रारीनुसार निदर्शनास आला आहे. या प्रकरणात संबंधित संस्थेच्या तिघांना अटकपूर्व जामीन अर्ज न्या. ख्वाजा यांनी फेटाळून लावला आहे.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाच्या आदेशाने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार  संबंधित संशयित अनिल महादू चौधरी, दीपिका अनिल चौधरी, नारायण तोताराम थोरात यांच्यासह मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय बागडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील नर्मदाबाई नागू चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 17 जून 2020 रोजी हा प्रकार झाला. यातील आरोपी चौघांनी संगनमत करून शाळेत इंग्रजी विषयाची जागा बिंदू नामावलीनुसार अनुसूचित जमाती करिता राखीव असताना अनुसूचित जमाती संवर्गावर अन्याय करण्याच्या हेतूने 2004 मधील आरक्षण कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. जागेवर अनुसूचित जातीचा उमेदवार भरून संस्थेची, शासनाची आणि सभासदांची फसवणूक करण्यात आली. यासाठी थेट बिंदू नामावलीच बदलून बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान या प्रकरणात शाळेच्या बिंदू नामावली नोंदवहीत सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी विषयाकरता एसी प्रवर्गाची संधी संपली असल्याने पुढील संधी एसटी प्रवर्गात उपलब्ध झाली आहे. याबाबतचा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. आरोपी यांनी बिंदू नामावलीच्या अनुषंगाने सदर विषयात एसटी प्रवर्गाचा उमेदवार न भरता सदर जागेवर एससी प्रवर्गाचा उमेदवार भरून बिंदू नामावली नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यानुसार ही जागा एसटी प्रवर्गाकरिता राखीव असताना एसी प्रवर्गाकडे कशी वर्ग करण्यात आली ,याविषयीचा सखोल तपास करणे बाकी असल्याची बाजू मांडण्यात आली. त्याचप्रमाणे बिंदू नामावली प्रक्रिया समजवून घेऊन ,त्या अनुषंगाने संबंधित कार्यालयाकडून माहिती प्राप्त होणे बाकी असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करू नये ,असा आक्षेप देखील घेण्यात आला. त्यामुळे गुन्ह्याचा तपास हा पूर्व टप्प्यात असून अशावेळी आरोपींना जामीन मंजूर झाल्यास तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने त्यानुसार न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

हेही वाचा:

The post धुळे येथे थेट बिंदू नामावलीच बदलून भरतीप्रक्रीयेबाबत तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला appeared first on पुढारी.