धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

धुळे; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा धुळे जिल्हा शिवसेनेने निषेध केला आहे. धुळे महापालिकेसमोर कदम यांच्या प्रतीकात्मक चित्राला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसैनिकांनी कठोर शब्दात टीका केली.

राजकारणात वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप होत असतात. पक्ष आणि नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ते विविध प्रकारचे युक्तिवादही करतो. परंतु, सध्या संसदीय राजकारणाची पातळी खालावली आहे. काही लोकांनी तर जणू यासाठीची सुपारीच घेतली आहे. आरोप-प्रत्यारोप करताना किंवा वाद-विवाद करताना मुद्यांवर व ध्येय धोरणावर आजपर्यंत चर्चा होती. परंतु टीका करताना कौटुंबिक पातळीवर घसरणे गलिच्छ पातळीवर येऊन बोलणे, हा काही लोकांचा धंदा झाला आहे. अशी टीका यावेळी झाली.

रामदास कदम यांना तब्बल दोन वेळा शिवसेनेने विधानपरिषद दिली. विधान परिषदेतून पर्यावरण मंत्री पद दिले. रामदास कदम यांच्या मुलाला आमदार केले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी पोटच्या पोरासारखी काळजी घेतली. त्या रामदास कदम यांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणे, ही विकृती आहे. रामदास कदम सारखा माणूस शिवरायांचा मावळा किंवा शिवसैनिक तर दूरच परंतु तो कुणाचाही मुलगा किंवा भाऊ म्हणून घेण्याच्या ही लायकीचा असू शकत नाही. अशा माणसाला शिवसेना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा देत शिवसेना धुळे महानगर तसेच शिवसेना महिला आघाडी वतीने जोरदार घोषणाबाजी करत जुन्या महापालिका चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे महानगर प्रमुख धीरज पाटील, ङॉ. सुशील महाजन, कैलास पाटील, महिला आघाडीच्या हेमा हेमाङे, सुनिता वाघ, जयश्री वानखेङे, आशा पाटील, देविदास लोणारी, भरत मोरे, नाना वाघ, तुषार भामरे, विनोद जगताप, ज्ञानेश्वर फुलपगारे, प्रविण साळवे, संजय जवराज, प्रकाश शिंदे, सुनिल चौधरी, छोटु माळी, सुभाष मराठे, महादु गवळी, कैलास मराठे, संदिप चौधरी, रोहित धाकङ, कैलास पाटील, पवन शिंदे, रामदास जगताप, दिनेश विष्णु पाटील, सुरेश चौधरी, नितीन जगताप, पिनु सुर्यवंशी, मुकेश भोकरे, अक्षय पाटील, शुभम रणधीर, अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध appeared first on पुढारी.