धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान – खा. हिना गावित

हिना गावित,www.pudhari.news

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा

विनाअनुदानित शाळा चालविणे ग्रामीण भागात मोठे आव्हान आहे. शासकीय अनुदान नसतानादेखील श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण बालकांना दिले जात असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित यांनी केला.

निजामपूर-जैताणे येथील ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनातील कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या.

धुळे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती हर्षवर्धन दहिते, सदस्य विजय ठाकरे, धीरज अहिरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, साली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री पवार, डॉ. नितीन सूर्यवंशी, पंचायत समितीचे सदस्य सतीश वाणी, माधुरी सोनवणे, मनोज सोनवणे (सरपंच भामेर), दीपक वाणी, निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा, उपाध्यक्ष दुल्लभ जाधव, सचिव सुमंतकुमार शहा, भिकनलाल जयस्वाल, मोहन सूर्यवंशी, वासुदेव बदामे, योगिता शहा, ललित आरुजा, अजितचंद्र शहा, सलीम पठाण, मुख्याध्यापक डॉ.मनोज भागवत, ललित सोनवणे उपस्थित होते.

संगीताच्या तालावर साकारलेला नृत्याविष्कार विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांसह प्रकटन करणारी पर्वणी ठरली. सामुदायिक नृत्य प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या लघुनाटिका संगीताच्या तालावर होत्या. वेशभूषा आदी कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केले. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा यांनी प्रास्ताविक केले. वासुदेव बदामे यांनी परिचय करून दिला. निहारिका नांद्रे, पीयुषा पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनोज भागवत यांनी आभार मानले. नितीन वाघ, प्रथमेश सोनवणे, प्रशांत साळवे यांनी परिश्रम घेतले.

शाळेला मिळाली ऑनलाइन देणगी

प्रा.नरेंद्र तोरणे यांनी ऑनलाइन उपस्थिती देऊन तृप्ती शहा (सीए) पुणे यांनी चंपकलाल शाह यांच्या स्मरणार्थ दोन लाख रुपये, नरेंद्र तोरवणे यांनी ऑनलाइन उपस्थिती देऊन म्हसाईमाता चॅरिटेबल ट्रस्टला वडील माणिकराव पुंडलिक तोरवणे यांच्या स्मरणार्थ एक लाख रुपये देणगी दिली.

हेही वाचा :

The post धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान - खा. हिना गावित appeared first on पुढारी.