धुळे : विनापरवाना जनावरांची वाहतूक, दोघांना अटक

विनापरवाना जनावरांची वाहतूक

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिरपूर ते चोपडा मार्गावर विनापरवाना जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल दिनकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद मूलचंद गुजर व केशव रिंकू राजपूत या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर ते चोपडा मार्गावर जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार थाळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने अहिल्यापूर फाट्याजवळ एचआर ३९ इ ७१४४ क्रमांकाचा ट्रक अडवला. याची तपासणी केली असता ७ लाख रुपये किंमतीच्या १० म्हशी, ४० हजार रुपये किमतींचे १० पारडु अशी सुमारे २० जनावरांची वाहतूक केली जात होती; पण जनावरांची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना ट्रक चालकाकडे नसल्याने पोलिसांनी चालकासह दोघांना ताब्यात घेतले. संशयित दोघे आरोपी हे हरियाणा राज्यातील रहिवासी आहेत. कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक केली जात होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

The post धुळे : विनापरवाना जनावरांची वाहतूक, दोघांना अटक appeared first on पुढारी.