धुळे : शिरपूर शेतकरी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर

शिरपूर www.pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखाना सुरू होण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. दरम्यान कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास पाठिंबा दर्शविण्यात आलेला आहे. उशिरा का होईना परंतु संचालक मंडळाला जागे झाल्याने हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कारखान्याने व्हाईस चेअरमन दिलीप पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर पंचायत समिती सभापती सत्तरसिंग पावरा, साखर कारखाना संचालक राहुल रंधे, प्रकाश चौधरी, नारायणसिंग चौधरी, के. डी. पाटील, संग्रामसिंग राजपूत, वासुदेव देवरे, दिगंबर पांडू माळी, भरत पाटील, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, जयवंत पावरा, सुचिता पाटील, मंगला दोरिक, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, योगेश बोरसे, राजगोपाल भंडारी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना हा भाडे कराराने देण्याबाबत संचालक मंडळाच्या मागील सभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेण्याबाबतचा ठराव सूचक प्रभाकरराव चव्हाण यांनी मांडला. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच टेंडर बाबत अंमलबजावणी होईल असेही त्यांनी जाहिर केले. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. मोहन पाटील यांनी अनुमोदन दिले. सर्वसाधारण सभेला संचालक मंडळ, सभासद, शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव मंजूर झाल्याबाबत उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त केला. दरम्यान याच संदर्भात राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयास पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय संचालक मंडळांनी यापूर्वीच घेणे अपेक्षित होते. पण उशिरा का होईना संचालक मंडळाला आता जाग आली आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या मार्गातील अडथळे तातडीने दूर करण्याची अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. यावेळी सुभाष सिंह जमादार, कल्पेश जमादार, मोहन पाटील ,गोपाल राजपूत ,ओंकार बंजारा ,अश्फाक शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल हे सध्या भारतीय जनता पार्टीत असून केंद्र ,राज्य तसेच जिल्हा बँकेत देखील त्यांचीच सत्ता आहे. त्यामुळे साखर कारखाना तातडीने भाडेपट्ट्यावर देऊन सुरू करावा अन्यथा भविष्यात आम्ही पुन्हा संघर्षाच्या तयारीत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : शिरपूर शेतकरी साखर कारखाना भाडे कराराने देण्याचा ठराव विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर appeared first on पुढारी.