धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

विज पंप

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून शेतातून वीजपंप आणि शेतकऱ्यांचे शेती उपयोगी वस्तू चोरीस जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या अंतर्गत कापडणे येथील शेतकरी सुभाष श्रावण पाटील यांनी देखील त्यांच्या शेतातील वीजपंप चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. या भागातील साहेबराव माळी तसेच विलास माळी यांच्या देखील शेतात अशाच पद्धतीने चोरी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होत होते.

या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला. यात त्यांना कापडणे येथील विकास शाम सोनवणे याने अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी विकास सोनवणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शेतकऱ्यांचे वस्तू चोरणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश झाला. तसेच राहुल पांचाळ, राहुल भिल या दोघांना ताब्यात घेतले आणि सुनील मालचे याचा शोध सुरू आहे. या टोळक्याकडून विनाक्रमांकाची एक दुचाकीसह 6 वीजपंप जप्त करण्यात आले आहेत.

तसेच या टोळक्याच्या विरोधात सोनगिर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली असून तपासात आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच पोलिस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा  

The post धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.