धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव

घेराव www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सक्तीची विजबील वसुली थांबवून वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी, दि.20 शिवसेना (ठाकरे गट) संतप्त झाली आहे. ग्रामीण विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. भामरे यांना शिवसैनिकांनी घेराव घालून संतप्त भावना व्यक्त केली आहे. ऐन सणासुदीच्या काळात वीज कंपनीने सुरळीत सेवा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

यावेळी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, मा. आ. प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, चंद्रकांत गुरव, महिला संघटीका हेमा हेमाडे, डॉ. जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, संगीता जोशी,संदीप सूर्यवंशी, विनोद जगताप कैलास पाटील उपस्थित होते.

धुळे शहरासह ग्रामीण भागात दररोज विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह विद्यार्थीवर्ग हवालदिल झाला आहे. पावसाळापूर्वी कामे न झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तिची ध्येय धोरणे ही ग्राहक संरक्षण कायद्याखाली येतात. एकीकडे ग्राहकांना चोवीस तास विजपुरवठा करणे हे कंपनीचे काम असून त्या बदल्यात ग्राहक विज कंपनीला बिलापोटी पैसे देतात. पण गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शहरातील विज ग्राहकांना दिवस-रात्र मिळून 12 ते 14 तासच विजपुरवठा होत आहे. विज ग्राहकांचे हक्क, यावर विद्युत वितरण कंपनी गदा आणू शकत नाही. विज ग्राहकांना धमकावून विज वसुली होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विज बील संदर्भात करण्यात येणारी कारवाई ताबडतोब थांबवून नागरिकांना दिलासा देण्यात यावा. अन्यथा शिवसेना विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात जनआंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : सक्तीची वीज बिल वसुली मोहीमेविरोधात शिवसेनेचा ठाकरे गटाचे अधीक्षक अभियंत्याला घेराव appeared first on पुढारी.