धुळे : सुतळी बॉम्बवरील स्टील ग्लास फुटून बालकाचा मृत्यू

धुळे; पुढारी वृत्तसेवा : स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रकार मुलाच्या अंगलट आला. सुतळी बॉम्ब फुटून त्यावरील स्टीलच्या ग्लासचे तुकडे मुलाच्या शरीरात घुसून तो गंभीर जखमी झाला. याध्येच या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत बालकाच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केले. यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार मृत बालकाचे प्रेत उकरून बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दिवाळीला फटाक्याचा मोठा आवाज झाला पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातात. धुळे शहरातील जुने धुळे भागातील बेघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या सोनू उर्फ मल्ल्या कैलास जाधव (वय 15) या बालकाने देखील असाच प्रयोग केला. मात्र हा प्रयोग त्याच्या अंगलट आला. सोनू जाधव याने सुतळी बॉम्ब लावत असताना त्यावर स्टीलचा ग्लास ठेवला. यानंतर सुतळी बॉम्बचा मोठा आवाज करत तो फुटला. मात्र स्टीलच्या ग्लासच्या चिंधड्या उडाल्या. या स्टीलच्या ग्लासचे तुकडे या मुलाच्या अंगात घुसले. यामध्ये सोनू हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या परिवार आणि नातेवाईकांनी ही घटना प्रशासनाला न कळवताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. सोनूच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याच्या परिवाराने नकार दिल्याने, पोलिसांनी तहसीलदार यांच्याकडे पत्र देऊन शवविच्छेदनाची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलाचा मृतदेह उकरून बाहेर काढत त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post धुळे : सुतळी बॉम्बवरील स्टील ग्लास फुटून बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.