धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त

धुळे www.pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

मध्य प्रदेशातून पुणे शहराकडे होणारी प्रतिबंधित गुटख्याची तस्करी मंगळवार (दि.6) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडली आहे. या प्रकरणात ट्रकसह 43 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरून एका वाहनात गुटख्याचा साठा तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक योगेश राऊत तसेच प्रभाकर बैसाणे ,श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, कमलेश सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, राहुल गिरी ,मयूर पाटील, तुषार पारधी ,योगेश साळवे या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर नरडाणा पोलीस ठाण्याजवळ हॉटेल अन्नपूर्णा नजीक सापळा लावला. यावेळी या पथकाने एम एच 18 बी जी 3302 क्रमांकाचा आयशर ट्रक थांबवला .या ट्रकचा चालक सदाशिव रामचंद्र राठोड याची चौकशी केली असता त्याने संशयित उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यासह सिकंदर कैलास सोनगरा याला ताब्यात घेण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठा आढळून आला. यात 15 लाखाच्या आयशर ट्रक सह 43 लाख 67 हजार रुपयाचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा गुटखा इंदोर येथून गाडीत भरण्यात आला असून तो पुणे शहराकडे जाणार असल्याचा प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

The post धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.