धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

मद्य तस्कर

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध मद्य तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. पथकाने एका चारचाकी वाहनासह साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवैध मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवडे यांना मिळाली. त्यानुसार विभागाच्या वेगवेगळ्या पथकांना जिल्हाभरात रात्रीची गस्त वाढवण्याचे आदेशित केल्यानुसार साक्री तालुक्यात गस्तीपथक संशयित ठिकाणी लक्ष ठेवून होते. त्यातच साक्री तालुक्यातील वार्सा-मोहगाव रोडवरील मांजरी फाटा येथे गस्ती दरम्यान संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये मारुती सुझुकी वॅगनर (एमएच-०३-झेड-४०३४) या वाहनाच्या चोर कप्पामध्ये अवैध देशी दारू मिळून आली.  हनचालकाची कसून चौकशी केली असता परराज्यातील विदेशी मद्य रॉयल ब्लू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या एकूण ८१६० पेट बॉटल (१७० बॉक्स) मिळून आले. वाहनचालक विनायक सुक-या आकल (मावची) (रा. शेंदवड, ता. साक्री) यास ताब्यात घेण्यात आले. वाहनासह जप्त मुद्देमाल असा एकूण १३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून गुन्हा नोंद करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक बी. एस. चोथवे यांनी सांगितले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बी. एस. चोथवे, शिरपूरचे निरीक्षक एस. एस. हांडे, भरारी पथकाचे निरीक्षक डी. एल.दिंडकर, दुय्यम निरीक्षक शिंदे, मानकर, सहायक दुय्यम निरीक्षक निकुंबे तसेच जवान गोरख पाटील, देवरे, गोसावी, वाहन चालक निलेश मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा:

The post धुळ्यात अवैध मद्य तस्करीचा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.