धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन

धुळे आंदोलन,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणा-या नेत्यांचा सर्वपक्षीय शिवप्रेमींकडून निषेध नोंदवण्यात आला. धुळ्यातील चाळीसगाव चौफुली वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन करुन त्यांचा निषेध करण्यात आला. विशेषता यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्रसंगी, मराठा क्रांती मोर्चा बरखास्त करीत असल्याची घोषणा देखील करण्यात आली. या पुढील काळात शिवप्रेमी जनता या नावानेच सामाजिक काम केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी महेश मिस्त्री, राजेंद्र ढवळे, वामन मोहिते, गोविंद वाघ, जितू इखे, संदीप सूर्यवंशी, माजी आमदार शरद पाटील, भानुदास बगदे, संजय बगदे, निंबा मराठे, विजय देवकर, साहेबराव देसाई, हनुमंत अवताडे, अशोक तोटे, अशोक वराडे, भरत मोरे, अतुल सोनवणे, डॉ. सुशील महाजन, वीरेंद्र मोरे, चंद्रकांत थोरात, विनोद जगताप, डॉ.अनिल पाटील, हेमा हेमाडे, साहेबराव देसाई, संदीप पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना धुळ्यात आता मराठा क्रांती मोर्चा बरखास्त करीत असल्याची घोषणा केली. यापुढे मराठा क्रांती मोर्चाचे आजी आणि माजी पदाधिकारी असा उल्लेख करू नये असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रातील तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता मराठा क्रांती मोर्चाचे गठन करण्यात आले होते. पण आता राज्यात मराठा क्रांती मोर्चा कुठेही नसल्यामुळे धुळ्यातील कार्यकारिणी देखील बरखास्त केल्याचे त्यांनी जाहीर केले. तर शिवसेनेच्या हेमा हेमाडे यांनी राज्यपाल यांच्या संदर्भात इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाचे आराध्य दैवत आहे. राजकीय स्वार्थासाठी मतदान मागताना त्यांच्या नावाचा वापर केला जातो. मात्र बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान केला जात असेल तर शिवप्रेमी जनता हा अपमान सहन करणार नाही. शिवप्रेमी जनता बेताल वक्तव्य करणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा :

The post धुळ्यात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.