नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात

अटक,www.pudhari.news

नंदुरबार : अवघ्या 24 तासात शहादा येथे झालेल्या घरफोडीचा तपास पूर्ण करीत शहादा पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील एक लाख तेहतीस हजार रुपयांचा ऐवज देखील जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. 24) सकाळी 9.30 दरम्यान अनिता देविदास मराठे यांच्या शहादा शहरातील विजय नगर येथील घराच्या दरवाजाचे कुलुप अज्ञातांनी तोडून 3 हजार रुपये रोख व 1 लाख 32 हजारे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 135,300/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शहादा पोलीस ठाण्याचे 03 वेगवेगळे पथके तयार करुन गुन्हा घडकीस आणून गुन्हयातील संशयित आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा :

The post नंदुरबार : चोवीस तासांत घरफोडीचा छडा, दोन अल्पवयीन पोलीसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.