नंदुरबार: दंडपाणेश्वर मंदिरातील चोरीचा छडा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Man ran away taking mobile from delivery boy without paying in pune

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : शहरातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या दंडपाणेश्वर गणपती मंदिरात दान पेट्या फोडून आणि मूर्तीवरील सव्वा किलो चांदीचे आभूषणे लंपास झाल्याने खळबळ उडाली होती. त्याचवेळी शंकेश्वर पार्श्वनाथ मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी केली होती. या चोरीचा तपास करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश मिळाले. दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 8 जानेवारीरोजी रात्री 11.00 ते 9 जानेवारीरोजी सकाळी 4.41 च्या दरम्यान नंदुरबार शहरातील दंडपाणेश्वर गणपती मंदिराच्या गाभाऱ्याचे मुख्य दरवाज्याचे कुलुपाचा कडी कोयंडा तोडून गणपतीच्या अंगावरील एक ते सव्वा किलो चांदीच्या दागिण्यांचे आभूषणे व दानपेटीमधील 12 हजार रुपये रोख रुपये तसेच पुखराज मोडमल जैन यांचे फार्म हाऊसमध्ये असलेल्या जैन मंदिरामधील दानपेटी फोडून अंदाजे 10 हजार रुपये रोख असा एकूण 52 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता.

याबाबत चंद्रकांत प्रल्हाद चौधरी (वय 50, रा. जळका बाजार, पोस्ट ऑफिस जवळ, नंदुरबार) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सीसीटीव्ही तपासून अज्ञात आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. परंतु सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्यामुळे आरोपींची निश्चित ओळख होत नव्हती.

दंडपाणेश्वर श्री. गणपती मंदिरातील चोरी मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील रेकॉर्ड वरील आरोपी किरतलीया शिवराम ब्राम्हणे (रा. मोहाला ता. सेंधवा जि. वडवाणी) याने आणि त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने मिळून केली. आणि चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्याकरीता जळगाव सराफ बाजारात जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन मध्यप्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा येथे रवाना केले. तपास पथकाने मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मोहाला गाठून दोन्ही आरोपींचा शोध घेतला.

जळगाव शहरातील सराफ बाजार व आजू-बाजूला वेषांतर करुन सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. किरतलीया शिवराम ब्राम्हणे (वय 35) आणि जतन रुमसिंग मोरे (वय 25, दोघे रा. मोहाला, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे दोघा चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 66,550 रुपये किमतीचे 1 किलो 210 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, 17.260 रुपयांची रोकड आणि 60 हजार रुपये किमतीची एक लाल काळया रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल (क्रमांक MP.46 MW. 0533) असा एकूण 1 लाख 44 हजार 170 किमतींचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचलंत का ? 

The post नंदुरबार: दंडपाणेश्वर मंदिरातील चोरीचा छडा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.