नवरात्रोत्सव : पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत सप्तशृंगगडावर शिव ध्वजरथाची मिरवणूक

नाशिक (कळवण): पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या भगव्या शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. या शिवध्वज रथयात्रेचा प्रारंभ राज्याचे बंदरे मंत्री व पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सप्तशृंगीदेवीच्या गडावरील पहिल्या पायरीवर पूजन करुन पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे उपस्थित होते.

कळवण शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत बोरसे, स्वप्निल पगार, अविनाश पगार, योगेश अमृतकार, यतीन सोनजे धनराज पवार, नरेंद्र वाघ, राजेंद्र आहेर, शरद भामरे यांनी सपत्नीक शिव ध्वजाची पूजा केल्यानंतर मान्यवरांनी शिवध्वज रथ यात्रेचा ढोल ताशाच्या गजरात जय अंबेचा सप्तशृंगी गावातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पप्पू बच्छाव, राजेंद्र भामरे, सुनील देवरे, राजेंद्र पगार, रोहित पगार, अतुल पगार, नितीन पगार, जयेश पगार, राहुल पगार, मनीष पगार, संदीप बेनके, अजय दुबे, रंजन देवरे, सुनील गांगुर्डे, दिपक खैरनार, बाळासाहेब गांगुर्डे, छत्रसाल पगार, दिनेश पवार, सुधाकर खैरनार, मयंक मोहिते आदींसह नागरिक उपस्थित होते.

ही मिरवणूक तालुक्यातील सर्व गाव, वाड्या वस्तीवर जाणार असून ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवस्मारक परिसरात शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. – भूषण पगार,  स्मारक समितीचे अध्यक्ष.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत सप्तशृंगगडावर शिव ध्वजरथाची मिरवणूक appeared first on पुढारी.