नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी

देवळा www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धेत देवळा पब्लिक स्कूलचा अष्टपैलू खेळाडू भावेश सूर्यवंशी याने राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त केले. क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व बाॅलबॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आदेशान्वये तेलंगणा राज्य सब ज्युनियर राष्ट्रीय बाॅलबॅडमिंटन स्पर्धा दि. १६ ते २० फेब्रुवारी रोजी मच्युरियल (तेलंगणा) येथे पार पडल्या. या स्पर्धेत भावेश सूर्यवंशी व महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक प्राप्त करून दिले आहे.

राष्ट्रीय खेळाडू भावेश सूर्यवंशीचे शनिवारी, दि. 4 शाळेत आगमन होताच गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, शिक्षक, कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी  के. डी. पाटील, एस. जी. शिंदे, यु. व्ही. सावकार, पी. बी. ह्याळीज, अमोल कुवर, ए. बी. शिंदे, आर. एस. काकडे, प्रविण गुंजाळ, राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले खेळाडू क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू भावेश याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश गीते आदींनी अभिनंदन केले. तसेच राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा:

The post नाशिकच्या अष्टपैलू खेळाडू भावेशची कांस्यपदकाला गवसणी appeared first on पुढारी.