नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नेपाळच्या नोटांची होणार छपाई

नाशिक नोट प्रेस,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोडच्या सीएनपी प्रेसला यंदा नेपाळच्या 430 कोटी रुपयांच्या नोटा तसेच भारताच्या पाच हजार कोटी रुपयांच्या छपाईची मोठी ऑर्डर मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आयएसपीला भारताचा पहिला ई पासपोर्ट छापण्याचा बहुमान मिळाला असून, ई पासपोर्टच्या 75 लाख इन ले चिप प्रेसला मिळाल्या आहेत. तर दोन दिवसांपूर्वी दिवंगत कामगारांच्या 48 वारसांना प्रेसमध्ये नोकरी देण्याचा प्रारंभ झाला. या घटनांमुळे यंदाची दिवाळी प्रेस आणि कामगारांसाठी लाभदायक ठरली आहे.

कमी वेळ व कमी मनुष्यबळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम हे नाशिकरोड प्रेस कामगारांचे वैशिष्ट्य आहे. सध्या प्रेसमध्ये पासपोर्ट, बँकांचे चेक्स, ज्युडिशियल व नॉन ज्युडिशियल स्टॅम्प्स, टपाल तिकिटे, पोस्ट कार्ड व चलनी नोटांची छपाई केली जाते. अलीकडे निवडणूक आयोगाचे इलेक्शन सील तसेच अन्य राज्यांचे लिकर सील छपाई होत आहे. 1962 साली नोटांसाठी नाशिकरोडला स्वतंत्र सीएनपी नोट प्रेस सुरू झाली. तेथे एक रुपयापासून पाचशेपर्यंतच्या भारतीय नोटा छापल्या जातात.

प्रेसने 1948 साली पाकिस्तानच्या तर 1940 साली चीनच्या नोटा छापून दिल्या. पूर्व आफ्रिका, चीन, इराण, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, इराक, नेपाळ आदी देशांच्या नोटांची तसेच हैदराबादच्या निजामाच्या नोटाही छापून दिल्या आहेत. 2007 साली नेपाळच्या नोटा छापल्या होत्या. यंदा पुन्हा 430 कोटी नोटा छापण्याची ऑर्डर नेपाळने दिली असून, कामगार रात्रीचा दिवस करून हे काम करत असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

सर्वात मोठ्या रकमेची ऑर्डर 

नेपाळच्या 430 कोटी नोटांखेरीज भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिकरोडच्या प्रेसला या आर्थिक वर्षासाठी पाच हजार कोटी इतक्या प्रचंड नोटा छापण्याची आर्डर दिली. त्यामध्ये वीस, पन्नास, शंभर, दोनशे, पाचशेच्या नोटांचा समावेश आहे. काम वेगात होण्यासाठी जपानी तंत्रज्ञांनी अनेक महिने परिश्रम घेऊन जपानी मशीन लाइन उभी केली आहे. एका लाइनमध्ये चार मशीन्स असतात. त्या नोटांचे कटिंग, छपाई, पॅकिंग एकाचवेळी करतात. सिंगलच्या दोन नवीन मशीन मार्चमध्ये तर ऑफसाइड प्रिंटिंगच्या चार मशीन्स एप्रिलमध्ये येणार आहेत. त्यामुळे नोट प्रेस आगामी काळात विक्रम करणार आहे.

आयएसपीला मिळाले लिकर सील, इलेक्शन सील, ज्युडिशियल स्टॅम्प्सचे काम

ब्रिटिशकालीन आयएसपी प्रेसमध्ये सध्या मद्याच्या बाटलीचे लिकर सील, निवडणुकांचे इलेक्शन सील, ज्युडिशयल व नॉन ज्युडिशल स्टॅम्प्स, पोस्टल व रेव्हेन्यू स्टॅम्प्स, स्टॅम्प पेपर्स, सर्व बँकांचे चेक्स छपाई सुरू आहे. भारतात पासपोर्ट फक्त या प्रेसमध्येच छापतात. आतापर्यंत 20 कोटी पासपोर्टची छपाई प्रेसने केली. आता जगातील 70 टक्के देशांप्रमाणेच भारताचे ई पासपोर्ट छापण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ते आव्हान प्रेसने स्वीकारत चाचणी तत्त्वावर ई-पासपोर्ट एक वर्षापूर्वीच तयार करून सरकारला दिले. ते देशातील विविध भागांमध्ये पाठवून चाचण्या घेतल्या. त्या यशस्वी झाल्याने प्रेस कामगारांच्या व नेतृत्वाच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. क्रेडिट कार्डासारखे सुरक्षित ई पासपोर्ट लवकरच तयार केले जाणार आहेत. त्यात मोबाइलच्या सीमकार्डसारखे सीम असेल. ते इन लेमध्ये बसवले जाईल. असे 75 लाख इन ले या प्रेसमध्ये नुकतेच आले असून, दोन महिन्यांत ई पासपोर्ट छपाई सुरू होईल. मार्चअखेरीपर्यंत 75 लाख ई पासपोर्ट छापून दिले जातील. त्यानंतर दरवर्षी एक ते दीड कोटीच्यावर ई पासपोर्ट तयार करून दिले जातील. हे काम 20 वर्षे कामगारांना पुरेल. ई पासपोर्टमध्ये डेटा चोरी, बदल, डेटा नष्ट करणे शक्य नाही. ई पासपोर्टसाठी नवीन आधुनिक मशीन, चेक प्रिंटिंगसाठी एमआयसीआर, नॉन ज्युडिशयल स्टॅम्पसाठी मायको परपरेशन या तीन नवीन मशीन लवकरच

नाशिकरोड प्रेसने 100 वर्षांत विविध देशांच्या चलनी नोटा छापून विक्रम केला आहे. दक्षिण आफि—का, लॅटिन अमेरिकेतील देशांच्या नोटांच्या ऑर्डरसाठी प्रयत्न सुरू आहेत. ई पासपोर्टची वर्षाला एक कोटीची ऑर्डर देऊन सरकारने कामगारांवर विश्वास दाखवला आहे. रात्रंदिवस मेहनत करून हा विश्वास सार्थ ठरवू.
– जगदीश गोडसे, सरचिटणीस, प्रेस मजदूर येणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये नेपाळच्या नोटांची होणार छपाई appeared first on पुढारी.