नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी

गौळाणे बिबट्या,www.pudhari.news

नाशिक (सिडको : पुढारी वृत्तसेवा
शहरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर मनपा हद्दीचे शेवटचे टोक असलेल्या गौळाणे गावात तिसर्‍यांदा दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिन्यात एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये याबाबतही चर्चा सुरू आहे

गौळाणे गावातील शांताराम चुंभळे यांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर रविवारी (दि. 7) रात्री 9च्या सुमारास बिबट्या रस्त्यावरून फिरताना दिसला होता. त्यानंतर बिबट्याने बंगल्यातील परिसरात प्रवेश केला. त्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विशेष म्हणजे याच बंगल्यात दि. 26 जून रोजी बिबट्याने प्रवेश केला होता. त्यावेळी त्याने कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर 2 ऑगस्टला रात्री याच बंगल्याच्या आवारात प्रवेश केला होता. तसेच रविवारी रात्री 9 वाजता याच बंगल्यात प्रवेश केला. रस्त्यावरून फिरताना या बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गौळाणे गावात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
बिबट्याने रात्रीच्या वेळी या गावातील पाळीव कुत्रे खाल्ले आहेत. नागरिकांनी घाबरू नये व सतर्कता बाळगावी व फिरताना खबरदारी घ्यावी. तसेच रात्री एकट्याने बाहेर फिरू नये, असे आवाहन वनाधिकारी विवेक भदाणे यांनी केलेे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उभारावा, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, सरपंच अजिंक्य चुंभळे व कैलास चुंभळे यांनी केली आहे.

हेेही वाचा :

The post नाशिकच्या गौळाणेत एकाच बंगल्यात बिबट्याची तीनदा घुसखोरी appeared first on पुढारी.