नाशिकच्या तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम

यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्प www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेने अंतराळाविषयी माहितीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाची निर्मिती केली. मात्र तारांगणवर होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने याचा समतोल साधताना महापालिकेची मोठी कसरत होत आहे. त्यामुळे तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम असल्याचे चित्र आहे.

त्यानंतर २००७ साली त्याची सुरूवात करण्यात आली. सुरुवातीला दीड ते दोन वर्ष तेच ते प्रयोग दाखविण्यात येत असल्याने व त्यातील नाविन्यता हरवल्याने उत्पन्नाला घरघर लागली होती. त्यानंतरही अत्यल्प प्रतिसादामुळे तारांगण बंद पडले. त्यानंतर २०१५ साली ते पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. आता तारांगण सुरू आहे, मात्र त्याचा पहिला शो झाला तर दुसरा होईल की नाही याबद्दलही साशंकता असते इतका अल्प प्रतिसाद त्याला मिळतो. आठवड्याला होणाऱ्या दोन शोमध्ये प्रत्येकी १०० सीट उपलब्ध असतात. मात्र ते अभावानेच पूर्ण भरतात. त्यामुळे जास्तीत जास्त २० ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते तर महिन्याकाठीर खर्च धरला तर कामगार वेतन, वीजबील, देखङोल खर्च यांची एकत्रित आकडेवारी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांच्या पुढे जाते. त्यामुळे आमदन्नी अठन्नी खर्चा रुपय्या अशी स्थिती आहे.

तारांगणची पार्श्वभूमी
१९९९ साली तारांगण निर्मितीचा प्रकल्प सादर करण्यात आला होता. महापालिकेच्या तत्कालीन महासभेने त्यास मंजुरी दिली. त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जलतरण तलावाजवळ मार्च २००० मध्ये तारांगणच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तारांगण प्रकल्प राबवणारी नाशिक महापालिका ही पहिली महापालिका आहे. हा प्रकल्प ऑनलाईन आनला गेला खरा मात्र, त्याच्या तीकीट बूकींगसाठी थेट जागेवरच जावे लागते. त्यातही ५ वाजेच्या शोचे तीकिट ४ वाजेनंतरच बूक होत असे सांगीतले जाते. त्यामुळेही त्याच्या बूकींगवर परिणाम होतो.

जागेचाच मुद्दा
अंतराळाविषयी वेगवेगळ्या तेरा फिल्म्स तारांगणमध्ये उपलब्ध असल्याचे समजते. मराठी, इंग्रजी, हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये येथे शो होत असल्याचे समजते. पुर्वी येथे दररोज ४ शो होत असत. मात्र आता केवळ शनिवार आणि रविवारी ४ आणि ५ वाजेचे असे दोनच शो होतात. येथील तिकिटाचा दर सर्वसान्यांच्या आवाक्यात असला तरी येथपर्यत येण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने त्यावरही मर्यादा येत आहेत. हा प्रकल्प जर मध्य नाशिकमधील पलूस्कर सभागृहाजवळ किंवा शालिमार पिरसरात शिवाजी गार्डनलगत कुठेतरी हलविल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तविली जाते आहे.

हेही वाचा:

The post नाशिकच्या तारांगणच्या पत्रिकेतील साडेसाती कायम appeared first on पुढारी.