नाशिकच्या देहरेवाडी’त प्रत्येक घरात नळाने पाणी, ग्रामस्थ झाले आनंदी

घरोघरी नळाला पाणी, www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील राशेगाव -देहरेवाडी ग्रुपग्रामपंचायतीत  केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ कनेक्शन देण्यात आले. हर घर जल अंतर्गत देहरेवाडी येथील प्रत्येक कुटुंबाना नळ कनेक्शन देवून पाणीपुरवठा सुरू केल्याने येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

यापूर्वी गावातील महिलांना विहिरीवरून पाणी ओडून आणावे लागत होते. आता याठिकाणी स्वतंत्र्य विहीर खोदून त्यातून टाकीत पाणी टाकले व त्यातून गावातील सर्व कुटुंबाला घरोघरी नळ कनेक्शन देण्यात आले आहे. या योजनेसाठी सरपंच बेंडकुळे, उपसरपंच विशाल वारुळे, ग्रामसेवक थोरात, अंबादास जाधव ,योगेश ढगे, भगवान ढगे, सिताराम ढगे, चेतन ढगे, नामदेव ढगे व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

राशेगाव देहरेवाडी ग्रुपग्रामपंचायत मध्ये नागरिकांनी आम्हाला निवडून दिले असून दोन्ही गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपसरपंच विशाल वारुळे यांनी केले. अन्न, वस्त्र व निवारा या नागरिकांच्या मूलभूत गरजा असून गावात याबरोबरच आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी याकडे लक्ष देऊन गावाच्या सर्व अडचणी येणाऱ्या काळात सोडविणार असून सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार असल्याचे उपसरपंच विशाल वारुळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या देहरेवाडी'त प्रत्येक घरात नळाने पाणी, ग्रामस्थ झाले आनंदी appeared first on पुढारी.