नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचार

सातपूर, नाशिक पुढारी वृत्तसेवा
सातपूर प्रबुद्ध नगर परिसरात पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वीस वर्षीय युवकाच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

पीडितांच्या कुटुंबाने पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार १६ ऑगस्ट रोजी पंधरा वर्षीय मुलगी घरी एकटी असताना संशयित आरोपी संतोष चारोस्कर राहणार प्रबुद्ध नगर याने घरात जबरीने प्रवेश करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने हा प्रकार समजल्यावर तात्काळ सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला.  यावरून संशयित आरोपी संतोष चारोस्कर यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द बलात्कार तसेच पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे  करीत आहे

हेही वाचा :

The post नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार appeared first on पुढारी.