नाशिकच्या भार्गवची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

भार्गव जाधव www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

येथील भार्गव जाधव या विद्यार्थ्यांची इस्रो येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. २०२२ मध्ये नोबेल फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नोबेल सायन्स टॕलेंट सर्च परीक्षेत भार्गव पंकज जाधवने घवघवीत यश मिळवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातुन घेतलेल्या या अत्यंत अवघड परिक्षेत दोन लेखी व तोंडी परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत तो गुणवत्ता यादीत आल्याने त्याची नोबेल फाउंडेशन या संस्थेमार्फत भारतीय अंतराळ संशोधन केंद्र बंगलोर (इस्रो) ,येथे होणाऱ्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. भार्गव हा खर्डे ता. देवळा येथील रहिवाशी व भिलवाड ता. देवळा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक पंकज जाधव व मानूर ता. कळवण येथील प्राथमिक शिक्षिका सुचिता पाटील यांचा मुलगा असून तो खेडगांव ता. दिंडोरी येथील नवोदय विद्यालयात इयत्ता ८ मध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या ह्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिकच्या भार्गवची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड appeared first on पुढारी.