नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात मास्कची एण्ट्री, कोरोना संक्रमणामुळे सतर्कता

सप्तशृंगी देवी,www.pudhari.news

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाल्यानंतर भारतातही त्यादृष्टीने सावध पावले उचलली जात आहेत. नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. भाविकांकडून संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडून घेण्यात आला आहे.

कोविड विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना तोंडाला मास्क असेल तरच मंदिर परिसरात प्रवेश मिळेल व भगवतीचे दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिरातील कर्मचा-यांनाही हा नियम लागू असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. भाविकांनी खबरदारी म्हणून बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन मंदिर विश्वस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

चीनमध्ये सुरु असलेला कोरानाचा आहाकार पाहाता, केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नाताळ व नवर्षाच्या स्वागतासाठी भाविक महाराष्ट्रातील मोठ्या मंदिरात गर्दी करण्याची शक्यता लक्षात घेता मंदिर प्रशासनाने भाविक व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली बनवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात मास्कची एण्ट्री, कोरोना संक्रमणामुळे सतर्कता appeared first on पुढारी.