नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

विषबाधा,www.pudhari.news

सुरगाणा( जि. नाशिक) : प्रतिनिधी

तालुक्यातील ठाणगाव बा-हे येथे हनुमान जयंती सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. 7) सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून साठ जणांना विषबाधा झाली. गूडफ्रायडेनिमित्त परिसरातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुटी असल्याने रुग्णांवर त्वरित उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी रुग्णसंख्येत वाढ झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाणगाव येथे हनुमान जयंतीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन होते. त्यात प्रसाद घेतल्यानंतर 4 वाजेच्या सुमारास पाच ते सात जणांना जुलाब, उलटी, मळमळणे हा त्रास जाणवू लागला. एकामागून एक अशा साठपेक्षा जास्त जणांना त्रास जाणवू लागला. त्यांना तात्काळ बा-हे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

त्यावेळी महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे उघड झाले. या सर्वच रुग्णांना बा-हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकारी डॉ. देवानंद चौधरी, डॉ. राहुल रजपूत हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिस निरीक्षक अनिल यांना ही घटना समजताच वाघ हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून महाप्रसादाचा नमुना घेऊन तपासणीकरिता अन्न व औषध प्रशासन प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा appeared first on पुढारी.