नाशिकजवळ बस व ट्रेलरचा भीषण अपघात, बस जळून खाक, 11 प्रवाशांचा मृत्यू

बसला भीषण अपघात

नाशिक ; पुढारी ऑनलाईन नाशिकमध्ये नांदूर नाक्‍याजवळ खासगी बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेत 11 प्रवाशांचा मृत्‍यू झाल्‍याची भीती वर्तवली जात आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे.

यवतमाळहून मुंबईकडे निघालेल्‍या खासगी बसला हा अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. नाशिकच्या नांदूर नाक्‍याजवळ हा अपघात घडला. या बसमध्ये अनेक प्रवासी असल्‍याची माहिती मिळत असून 11 प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अॅम्ब्यूलन्स दाखल झाली असून जखमींना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

 

The post नाशिकजवळ बस व ट्रेलरचा भीषण अपघात, बस जळून खाक, 11 प्रवाशांचा मृत्यू appeared first on पुढारी.