नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती

कोल्‍हापूर शहर पोलीस अपाधीक्षकपदी अजित टेके

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील पोलिस निरीक्षक पदावरील १७५ अधिकाऱ्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये पदोन्नती देण्याचा निर्णय झाला. त्यातील १४३ अधिकाऱ्यांना महसूल उपविभागीय संवर्गाचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिकमधील 13 निरीक्षकांना पदोन्नती मिळाली असून, त्यांची उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तपदी बढती देऊन बदली करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीणचे निरीक्षक बापू रोहोम यांची नागपूर ग्रामीणच्या काटोलमध्ये आणि वसंत भोये यांची नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत उपअधीक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस अकादमीतले मनोहर दाभाडे यांची अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये, तर किरण साळवी यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीतच उपअधीक्षकपदी पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. नाशिक जात प्रमा‌णपत्र पडताळणी समितीचे देवराम ग‌वळी यांची मलकापूर उपविभागीय अधिकारीपदी तर, बाबासाहेब ठोंबे यांची नाशिक गुप्तचर प्रशिक्षण संस्थेत उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. या पदोन्नती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना नियमाधीनतेचा आणि सेवाज्येष्ठतेचा हक्क नसेल, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे. पदोन्नतीसह बढती मिळाल्याने शहरातील भद्रकाली, सरकारवाडा, गुन्हे शाखा, विशेष शाखेचे प्रभारी निरीक्षक पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे या पदांवर कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉ. कोल्हे सहायक आयुक्तपदी
शहरातील सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची नाशिक शहर आयुक्तालयात सहायक आयुक्तपदी पदस्थापना झाली आहे, तर गुन्हे शाखा युनिट दोनचे आनंदा वाघ यांना श्रीरामपूर, भद्रकालीचे दत्ता पवार यांना शहादा, सरकारवाडा पोलिस ठाण्यांतील साजन सोनवणे यांना अक्कलकुवा, विशेष शाखेचे संजय बांबळे यांना धाराशिव, दहशतवादीविरोधी पथकाचे हेमंत सोमवंशी यांना गुन्हे अन्वेषण विभागात अपर पोलिस अधीक्षक, प्रभाकर घाडगे यांना ठाण्याच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत उपअधीक्षक पदावर बढती मिळाली आहे.

वादग्रस्त माईनकर रत्नागिरी मुख्यालयात
नाशिकमध्ये गुन्हे शाखा, उपनगर, इंदिरानगर पोलिस ठाण्यांत जबाबदारी सांभाळेल्या वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांची रत्नागिरी मुख्यालयात बदली झाली आहे. माईनकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल झाला असून, त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते रजेवर होते.

हेही वाचा :

The post नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती appeared first on पुढारी.