नाशिकमधील 31 ठिकाणे धोकादायक; दुर्घटना घडल्यास अग्निशमन पोहोचणेही आहे कठीण

झोपडपट्या नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एखादी दुर्घटना घडली, तर कमीत कमी कालावधीत अग्निशमन विभागाची सेवा पोहोचावी अशा प्रकारे अग्निशमन दल हे सुसज्ज असते. परंतु, नाशिकमधील सुमारे 31 ठिकाणे अशी आहेत की, त्या धोकादायक ठिकाणी या विभागाची वाहनेच पोहोचू शकत नाहीत. यामुळे या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन विभागाची वाहने पोहोचू शकत नाही, अशा 31 ठिकाणांमध्ये 11 धोकेदायक झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. तसेच जुने नाशिक परिसरातील बुधवार पेठ, खैरे गल्ली, बागवानपुरा यासह 20 ठिकाणेदेखील धोकादायक असल्याचे समोर आले आहे. उन्हाळ्यात आगी लागण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. त्याचबरोबर शॉर्टसर्किट, गॅस सिलिंडरचे लिकेज अशा विविध कारणांमुळे आग लागण्याच्या घटना घडत असतात. अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानीला सामोरे जावे लागते. तसेच अनेकदा जीवितहानीदेखील घडते. मोठ्या स्वरूपात आग लागलेल्या चार घटनांमध्ये दोन झोपडपट्ट्यांचा तसेच मॉलसह एका दुकानाला अशा घटनेला तोंड द्यावे लागले आहे. रेडक्रॉस सिग्नलजवळील संगणक गोदामाला तसेच गंजमाळ येथील मास्टर मॉलला लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली. या घटनांमुळे मनपा आयुक्तांनी व्यावसायिक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटबरोबरच इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. आगीच्या घटनांमुळे शहरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जाणार आहेत. गावठाण व झोपडपट्टी भागात 20 ठिकाणी हायड्रंट पॉइंट निश्चित करताना स्मार्ट सिटी कंपनीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शहराचा विस्तार वाढत असताना आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा मजबूत करण्याचे प्रयत्न केले जात आहे . त्यादृष्टीने पायाभूत सुविधा भक्कम करताना धोकादायक जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

एखादी घटना घडली, तर अग्निशमन विभागाची वाहनेच जाऊ शकणार नाही, अशी ठिकाणे महापालिकेने शोधून काढली असून, त्यात जुने नाशिकमधील नागसेननगर, संत कबीरनगर, गंजमाळ येथील भीमनगर व पंचशीलनगर, टाकळी गाव, अशोकस्तंभ भागातील मल्हारखाण, उपनगर कॅनॉल रोडवरील आम—पाली झोपडपट्टी, इंदिरानगर झोपडपट्टी (गांधीनगर) राहुलनगर, पंचशीलनगर, पश्चिम विभागातील जोशी वाडा, सातपूर विभागातील संतोषी माता झोपडपट्टी, पंचवटी विभागातील कॅनॉल रोड तसेच नाशिक गावठाणातील बुधवार पेठ, बागवानपुरा, भद्रकाली या भागांचा समावेश आहे या भागात अवघे एक ते दोन मीटरचे रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने जाऊ शकत नाहीत.

 धोकादायक ठिकाणे

हेही वाचा :

The post नाशिकमधील 31 ठिकाणे धोकादायक; दुर्घटना घडल्यास अग्निशमन पोहोचणेही आहे कठीण appeared first on पुढारी.