नाशिकमधून अधिकाधिक सभासद नाेंदणी करण्याचा मनसेचा संकल्प

सभासद नोंदणी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाच्या नियोजनानिमित्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे झाली.

यावेळी माहिती देताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम व शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सभासद नोंदणी करण्यासाठी ८८६०३००४०४ या क्रमांकावर मिसकॉल दिल्यास https://hindavi-nondani.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती भरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य होता येईल, अशी माहिती दिली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सभासद नोंदणीसाठी विविध सूचना मांडल्या. राज ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार जास्तीत जास्त सभासद नोंदणी नाशिकमधून करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे तसेच मुंबईत सभासद नोंदणीचा प्रारंभ झाला असून, महाराष्ट्रात सर्वत्र सभासद नोंदणीबाबत मनसेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ माजी नगरसेवक सलिम शेख, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, विक्रम कदम, नितीन साळवे, योगेश लभडे, नितीन माळी, प्रवक्ता व शॅडो केबिनेट सदस्य पराग शिंत्रे, किशोर जाचक, राकेश परदेशी, विजय रणाते, प्रमोद साखरे, संतोष कोरडे, सचिन सिन्हा, अक्षय खांडरे, विनायक पगारे, अमित गांगुर्डे, विजय आगळे, गोकुळ नागरे आदी उपस्थित होते. विक्रम कदम यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नाशिकमधून अधिकाधिक सभासद नाेंदणी करण्याचा मनसेचा संकल्प appeared first on पुढारी.