नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज

कृषी महोत्सव,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शासनाच्या आत्मा विभागातर्फे नाशिकमध्ये आजपासून (दि. ६) कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापुर राेडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर पाच दिवस भरणाऱ्या महाेत्सवात नाशिककरांना शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करता येईल. तसेच सेंद्रीय शेतीमाल, आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शनासह खाद्य महोत्सवासह शेतीशीनिगडीत परिसंवादाचे आयोजन केले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डोममध्ये साधारणपणे २०० स्टॉल उभारण्यात आले आहे. याबाबत काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहीती आत्माचे राजेंद्र निकम यांनी दिली.

डोममध्ये उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये शेतकरी, शेतकरी उत्पादक गट व बचतगटांसह शासनाच्या कृषीशीनिगडीत विविध विभागांचे स्टॉल असतील. दुसऱ्या भागात कृषीनिविष्ठा कंपन्या, शेती अवजारांचे कंपन्या आदींना स्टॉलसाठी जागा देण्यात आली आहे.

‘आत्मा’च्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या, बचतगटांना त्यांच्या उत्पादनासाठी हक्काचे व्यासपिठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पाच दिवस फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया ऊद्योग, महिला परिसंवाद, बाजाराभिमुख कृषक ऊत्पादने व विपणन, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य अनुषंगाने विविध परिसंवाद तसेच खरेदीदार-विक्रेता संमलेनाचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये आजपासून कृषी महोत्सव, नागरिक व शेतकऱ्यांसाठी दोनशे स्टॉल सज्ज appeared first on पुढारी.