नाशिकमध्ये उद्या भाजपची बैठक, २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार

भाजप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये येत्या १० आणि ११ फेब्रुवारीला भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होत असून, या बैठकीस राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस, कोअर कमिटी सदस्य आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या नियोजनासंदर्भात नाशिक महानगराची बैठक बुधवारी (दि.१) वसंतस्मृती येथे पार पडली. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. ॲड. राहुल ढिकले, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील, माजी महापौर सतीश कुलकर्णी, रंजना भानसी, प्रदीप पेशकार, गणेश कांबळे, काशीनाथ शिलेदार आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेश मुख्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीचा आदर्श इतरांनी घ्यावा, अशी ही कार्यकारिणी नाशिकमध्येदेखील संपन्न व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

आ. देवयानी फरांदे यांनी गल्लीबोळातील कानाकोपरा भाजपामय होण्यासाठी शक्य त्या त्या ठिकाणी रोषणाई झाली पाहिजे. चौकाचौकांत राष्ट्रीय व प्रदेश नेत्यांच्या स्वागतांचे बॅनर लागले पाहिजे व आपले कार्यकर्ते नक्कीच त्या दिशेने काम करतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते विजय साने यांनी नाशिकमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीतील विविध अनुभवांचे कथन केले. गिरीश पालवे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या नियोजनाची माहिती सादर केली.

यावेळी आध्यात्मिक आघाडी प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले, रोहिणी नायडू, महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आडके, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, अजिंक्य साने, दिनकर पाटील, हेमंत गायकवाड, सुनील देसाई, चंद्रशेखर पंचाक्षरी, भगवान काकड, देवदत्त जोशी, अविनाश पाटील, प्रसाद आडके, सुरेश पाटील, कुणाल वाघ, संभाजी मोरुस्कर, डॉ. प्रशांत पाटील, शरद मोरे, सुनील खोडे, महेश हिरे, सतीश सोनवणे, योगेश हिरे, अलका अहिरे, अर्चना दिंडोरकर, मंजूषा दराडे, इंदुबाई नागरे, प्रतिभा पवार, राकेश दोंदे, ॲड. श्याम बडोदे, शिवाजी गांगुर्डे, छाया देवांग आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये उद्या भाजपची बैठक, २३ खासदारांसह मंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.