नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

नाशिक : पुढारी ऑनलाइन

नाशिकमध्ये आदिवासी विकास विभागातील अभियंत्याला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिकमध्ये आता सीबीआयने देखील मोठी कारवाई केली आहे. सेंट्रल जीएसटीचे वरिष्ठ अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना लाच घेताना सेंट्रल सीबीआयने रंगेहाथ पकडले आहे.

चव्हाणके हे जीएसटी कर विभागाचे अधीक्षक असून त्यांना नाशिकच्या सिडको कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून या कारवाई नंतर नाशिकमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सीबीआयने केलेली ही कारवाई पाहाता याठिकाणी काहीतरी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसात चार घटना घडल्या आहेत. यामध्ये 20 हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोग्य विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन लांजेवार यांना पकडले. त्यानंतर एसीबीच्या सापळ्यात दिंडोरी तहसील कार्यालयातील मंडळ अधिका-याला 10 हजाराची लाच घेताना पकडले. नाशकात काल आदिवासी विकास विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर दिनेशकुमार बागुल याला 28 लाखांची लाच घेताना पकडले.  आज सीबीआयचे रणजीत कुमार पांडेय यांनी जीएसटी अधिकारी चव्हाणके यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

The post नाशिकमध्ये जीएसटी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात appeared first on पुढारी.