नाशिकमध्ये जैन बांधवांचे मुंडन आंदोलन, ‘या’ निर्णयाला होतोय विरोध

मुंडन आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यापासून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाने देशभर आंदोलन पुकारले आहे. जैन समाजाने या निर्णयाला विरोध म्हणून आता मुंडन आंदोलन सुरु केले असून नाशिकमध्येही जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

अशोक स्तंभ येथे शनिवार (दि. 31) सकाळी मुंडन आंदोलन करण्यात आले. पारजी लोहाडे, मयुर जंगवाल, श्याम महाजन, दिपक काळे, अजय नाहाय, तुषार कासलीवाल, देवेश बोरा, अमित लोहाडे या जैन बांधवानी मुंडन करुन झारखंड सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

छाया-हेमंत घोरपडे

झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यात जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण स्थित आहे. या तिर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यास जैन समाजाचा विरोध आहे. पर्यटन स्थळ झाल्यास येथील पवित्रता नष्ट होईल असे जैन बांधवाचे म्हणणे आहे. याविरोधात दिल्ली येथे सहा दिवसांपासून जैन बांधवाचे आमरण उपोषण सुरु आहे. आज देशभरात 500 च्यावर जैन बांधव मुंडन करुन निषेध नोंदवणार आहेत. या आंदोलनाची दखल न घेतल्यास सोशलमीडियाच्या माध्यमातून आंदोलन करुन निषेध नोंदवला जाईल असा इशाराही यावेळी जैन बांधवानी दिला.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये जैन बांधवांचे मुंडन आंदोलन, 'या' निर्णयाला होतोय विरोध appeared first on पुढारी.