नाशिकमध्ये पांरपारिक पद्धतीने रेड्यांची पूजा

रेडा मिरवणूक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी परिसरात शहरातील गवळी बांधव व गोठेधारकांनी पारंपरिक पद्धतीने गोधनाची पूजा केली, तसेच रेड्यांची वाजत-गाजत शोभायात्रा काढली. शोभायात्रेची सुरुवात काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा येथील वाघाडी तालीम संघापासून झाली. यावेळी रेड्यांनी तालमीत प्रवेश करून मारुतीला सलामी दिली.

शोभायात्रामध्ये माजी नगरसेवक उल्हास धनवटे, अनिल कोठुळे, धनंजय कोठुळे, सुनिल महंकाळे, आप्पा गवळी, कोठुळे डेअरीचे संचालक नयन कोठुळे, गणेश साळुंके, राजेंद्र भोरे, किरण शेळके, आदी गोठेधारकांचे हेल्ले सहभागी झाले.

या वेळी सरदार चौक, शनि चौक, मालवीय चौक, नाटकर लेन, अंबिका चौक, सुकेणकर लेन आदी ठिकाणी गृहिणींनी हेल्याची विधिवत पूजा केली. त्या नंतर दिंडोरी नाकामार्गे शोभायात्रा श्री म्हसोबा महाराज मंदिर येथे पोहोचली. यावेळी रेड्यांनी श्री म्हसोबा महाराजांना सलामी दिली. या शोभायात्रेमध्ये गोठेधारक तसेच हनुमान चौक मित्रमंडळ, शनि चौक मित्रमंडळ, संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ, जगदंबा मित्रमंडळ, अंबिका चौक मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये पांरपारिक पद्धतीने रेड्यांची पूजा appeared first on पुढारी.