नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’

गंगापूर धऱण नाशिक

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोटमध्ये दिवसभरात 113 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणात 67 टक्के साठा होऊन दहा हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. र्त्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून, दिवसभरात गौतमी धरणाच्या पाणलोटमध्ये 105, र्त्यंबकेश्वर येथे 93 , आंबोलीत 166 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणातील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, दिवसभरात दारणा धरणाच्या पाणलोटमध्ये 58 मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणात 70 टक्के साठा असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा
धरणसाठा (दलघफूमध्ये) टक्के
गंगापूर 3752 67
काश्यपी 567 31
गौतमी 760 41
आळंदी 355 44
पालखेड 317 49
करंजवण 2375 44
वाघाड 1254 54
ओझरखेड 820 38
पुणेगाव 435 70
दारणा 5032 70
भावली 931 65
मुकणे 3660 51
वालदेवी 171 15
कडवा 1163 69
भोजापूर 19 5
चणकापूर 1989 45
हरणबारी 775 66
केळझर 113 20
नाग्यासाक्या 15 4
गिरणा 6315 34
पूनद 736 56

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा 'असा' appeared first on पुढारी.