नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर

देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकमधील डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे हेही संमेलनस्थळी उपस्थित आहेत. यावेळी फडणवीस – खडसे एकाच मंचावर उपस्थित असल्याचे बघून एकच चर्चा रंगली.

गिरीश  महाजन यांच्यासह भाजपचे इतर अनेक नेते समंलेनस्थळी उपस्थित आहेत. यावेळी खडसे हे फडणवीस व महाजन या दोघांपासून काही अंतर राखूनच बसलेले दिसले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या गर्दीत एकनाथ खडसे एकाकी पडल्याची चर्चा होत आहे.

कालच या समंलेनाचे उद्घाटन झाले. आज या संमेलनाचा दुसरा दिवस आहे. तर बुधवारी (दि.31) संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खनिकर्म व बंदरे विकासमंत्री दादा भुसे, माजी मंत्री जयकुमार रावल आदी हजेरी लावणार आहेत.

The post नाशिकमध्ये महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर appeared first on पुढारी.