नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला ‘बाळासाहेबांची शिवसेने’कडून जोडे मारो आंदोलन

शिंदे गटाकडून जोडे मारो आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे (शिंदे गट) गुरूवारी (दि.१७) निषेध करत राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारून संताप व्यक्त केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यात आल्यास त्यांना जसेच तसे उत्तर देऊ असा इशारा बाळासाहेबांची सेना गटातील महिला पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कुठलाही इतिहास माहिती नाही. असे असतांना त्यांनी अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

या आंदोलनाप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, भाऊलाल तांबड, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी भोर, माजी नगरसेवक मामा ठाकरे, सुधाकर जाधव, माजी नगरसेवक श्याम साबळे, युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, जिल्हाप्रमुख महिला आघाडी लक्षमी ताठे, शहरप्रमुख महिला आघाडी अस्मिता देशमाने, उपमहनगर प्रमुख कोमल साळवे, विलास बोराडे, सागर चौधरी, अजय पंडीत, स्वप्नील पांगरे, शंकर पांगरे, राजेंद्र मोहिते आदी शिवसैनिक उपस्थित  होते. 

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये राहुल गांधीच्या फोटोला 'बाळासाहेबांची शिवसेने'कडून जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.