नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत

दुर्मिळ कासव,www.pudharinews

नाशिक : वन्यजीव व त्यांच्या अवयव तस्करीचे केंद्रबिंदू बनलेल्या नाशिकमधील पेटशॉपमधून दुर्मीळ वन्यजीवांची सर्रास विक्री सुरू आहे. वनविभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.22) मुंबई नाका परिसरातील एका पेटशॉपवर कारवाई करत विक्रीसाठी ठेवलेले दुर्मीळ कासव हस्तगत केले.

पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहायक गणेश झोळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने महामार्ग बसस्थानकासमोरील बुरहानी फिश अ‍ॅक्वेरियमवर छापा मारला. दुकानाच्या झाडाझडतीत दुर्मीळ कासव आढळले. कासवाच्या अवैध विक्री प्रकरणी खोजेमा असगरअली तिन्वाला याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, हिनाली सोनवणे, रुबिना पठाण, किशोरी सानप, इको-इकोचे वैभव भोगले, अभिजित महाले आणि वाहनचालक सुनील खानझोडे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये वनविभागाचा पेटशॉपवर छापा ; दुर्मीळ कासव हस्तगत appeared first on पुढारी.