नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद

बिबट्या कातडी तस्करी,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
शहराचा उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळील सायकल सर्कल येथे बिबट्याची कातडी, चिंकाराचे दोन शिंगे आणि नीलगायीचे दोन शिंगे या वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा संशयित तरुणांना वनपथकाने सापळा रचत जेरबंद केले आणि वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचा आणखी एक प्रकार उधळला. दहा दिवसांपूर्वी इगतपुरीच्या वन्यजीव तस्करीचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक प्रकार उघडकीस आला.

कृषीनगरच्या सायकल ट्रॅकजवळ तीन महाविद्यालयीन तरुण वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. नाशिक प्रादेशिकचे मुख्य वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या विशेष पथकाने सापळा रचला. सायंकाळी 6.30च्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून या तिघा तरुणांना वन्यजीवांच्या अवयवांसह पथकाने ताब्यात घेतले. या तिघा महाविद्यालयीन तरुणांचे आणखी काही साथीदार असण्याचा संशय पथकाने व्यक्त केला आहे. या तिघांकडे सापडलेल्या चार मोबाइलमधील माहितीआधारे महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत तिघा तरुणांवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये वन्यजीवांच्या अवयवांची पुन्हा तस्करी; तिघे संशयित जेरबंद appeared first on पुढारी.