नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे

निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथे वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करू आणि त्यासाठी पाच कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नाशिक दौऱ्यावेळी बावनकुळे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या औरंगाबादरोडवरील फार्म हाउसला भेट दिली. यावेळी कोणार्कनगर येथील माय माउली भजनी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते. नाशिकमध्ये वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, त्यांच्यासाठी स्वतंत्र भवन नसल्याने त्यांची फार अडचण निर्माण होते, असे संस्थेचे अध्यक्ष माणिक देशमुख तसेच ज्ञानेश्वर महाराज, सुभाष महाराज, राजेंद्र खैरनार महाराज, नानासाहेब पवार, प्रभाकर सोनवणे, ज्ञानेश्वर निमसे यांनी निदर्शनास आणून दिले. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवा, बाकीचे मी बघून घेतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, भाजप प्रदेश कार्यालय प्रभारी रवि अनासपुरे, ज्येष्ठ नेते विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, मच्छिंद्र सानप, कमलेश बोडके, प्रशांत जाधव, सुनील केदार, जगन पाटील, पवन भगूरकर, श्याम पिंपरकर, अमित घुगे, नाना शिलेदार, चंद्रशेखर पंचाक्षरी, धनंजय पुजारी, उत्तम उगले आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे appeared first on पुढारी.