नाशिकमध्ये सेवानिवृत्त पोलीसांचे आंदोलन, ‘या’ आहेत मागण्या

सेवा निवृत्त पोलिसांचे आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन

सेवानिवृत्तीनंतर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोफत मेडिकल सुविधा  देण्यात याव्यात, 1 जुलैची वेतन वाढ लागू करावी, तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची पी.एस.आय. पदावर पदोन्नती करण्यात यावी, आर्मीच्या धरतीवर टोल माफी करण्यात यावी, सेवानिवृत्त पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये सेवा निवृत्त पोलीस बांधवांनी आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.8) कल्याणकारी संस्थेतर्फे सेवानिवृत्त पोलिसांच्या विविध मागण्यांसाठी  आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते. प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करित आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अध्यक्ष अशोक निकम, कार्याध्यक्ष तानाजी ढुमणे, सचिव मुजफर अन्वर सैय्यद, उपाध्यक्ष विलास मोहिते, नियाजअली सैय्यद, सहसचिव शिवाजी भालेराव आदी आंदोलनात सहभागी होते.

छाया- हेमंत घोरपडे

सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ दीड ते दोन वर्षे उशिरा मिळालेले आहेत. त्यामुळे उशिरा मिळालेल्या रकमेवरती शासन आदेशाप्रमाणे प्रचलित नियमानुसार व्याज मिळावे, अथवा एका तरी पाल्यास भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. मॅट कोर्टामध्ये अनेक प्रकरणे ही अनेक वर्षं न्यायप्रविष्ठ आहेत. सेवानिवृत्ती अंमलदार व पोलीस दलातील कार्यरत अंमलदार यांची न्यायप्रविष्ठ प्रकरणे त्वरित निर्गती होण्यासाठी ज्यादा न्यायाधीशांची नेमणूक करण्यात यावी, शिक्षक व पदवीधर मतदार संघाप्रमाणे पोलीस मतदार संघ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारला महाराष्ट्र शासनाकडून पत्र पत्रव्यवहार करण्यात यावा, राष्ट्रपती पोलीस पदक सन्मानित पोलिस अंमलदार यांना एसटी पीएमटी, रेल्वे, विमान प्रवासात ५० टक्के ते ७५ टक्के सुट देण्यात यावी. तसेच सेनादलातील जवानांचे धरतीवरती घराचा टॅक्स सर्व पोलीस बांधवांसाठी माफ  करण्यात यावा अशा विविध मागण्या सेवा निवृत्त बांधवांनी केल्या.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये सेवानिवृत्त पोलीसांचे आंदोलन, 'या' आहेत मागण्या appeared first on पुढारी.