नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात

लाच www.pudharinews

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल एक लाखाची लाच मागणा-या आणि प्रत्यक्षात 50 हजार रुपये स्वीकारताना भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक महेशकुमार शिंदे आणि लिपीक अमोल भीमराव महाजन यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दि.(31) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली.

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक झाली होती. ही चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी शिंदे याने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी 50 हजार रुपये स्वीकारले. तसेच लिपीक महाजन याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्याविरुद्ध सरकार वाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

या कारवाईनंतर नागरीकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे. त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ 1064 क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीने केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये 50 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचा अधीक्षक जाळ्यात appeared first on पुढारी.