नाशिकरोडला शिवसेना,मनसे अन् राष्ट्रवादीला मोठे खिंडार

खिंडार www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाशिकरोड भागात शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडार पडले आहे. तर महाराष्ट्र नवनर्माण सेना अन् राष्ट्रवादीलाही मोठा राजकिय फटका बसला आहे.

शिवसेनेचे माजी शिक्षण मंडळ सदस्य बाबुराव आढाव, मनसेच्या माजी नगरसेविका मेघा नितीन साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरिष भडांगे, मनसेचे नाशिकरोड विभाग प्रमुख विक्रम कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे मंगळवारी (दि. २७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना बाळासाहेब म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची राजकीय बलाबल वाढण्यास मोठा हातभार लागणार आहे. नाशिकरोड किराणा दुकान संघटनेचे अध्यक्ष सुनील महाले, गणेश कदम, ॲड साहेबराव बोराडे, विलास पाटील, दिपक बोराडे आदींचा यामध्ये प्रवेशात समावेश आहे. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे, रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे आदी उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी नाशिकरोड भागातील माजी नगरसेविका जयश्री खर्जुल, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सेनेचे ज्येष्ठ नेते तथा नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविणारे चंद्रकांत लवटे आदींनी शिंदे गटात प्रेवश केला होता. या प्रवेश सोहळ्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीतील शिंदे गटाची ताकद निश्चितच वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

शिवसेनेत सद्या ज्येष्ठांना डावलले जात होते. कुठल्याही कार्यक्रमाची माहिती दिली जात नव्हती. आम्ही शिवसेनेत असुन नसल्यासारखे होतो. त्यामुळे पक्ष सोडवा लागला. – बाबुराव आढाव, माजी सदस्य शिक्षण मंडळ सदस्य.

 

येत्या काही दिवसांत नाशिकरोड परिसरातून जवळपास सर्वच पक्षातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणूक पूर्वी शिंदे गट शक्तिशाली झालेला दिसेल. – सूर्यकांत लवटे.

 

शिंदे गटात येण्यासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत, पण सद्या त्यांना वेटींगवर ठेवले आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीत प्रवेश सोहळा होइल. – रमेश धोंगडे, माजी नगरसेवक.

हेही वाचा:

The post नाशिकरोडला शिवसेना,मनसे अन् राष्ट्रवादीला मोठे खिंडार appeared first on पुढारी.